धनगर समाजाचा परिचय मेळावा
By Admin | Updated: January 10, 2017 01:20 IST2017-01-10T01:20:43+5:302017-01-10T01:20:43+5:30
धनगर समाजाचा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा स्थानिक प्रजापतीनगरातील चिंतामणी

धनगर समाजाचा परिचय मेळावा
यवतमाळ : धनगर समाजाचा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा स्थानिक प्रजापतीनगरातील चिंतामणी देवालयात पार पडला. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती लता खांदवे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.विकास महात्मे, ज्ञानेश्वरी रूपनर, संजय शिंदे पाटील, डॉ.संदीप धवने, डॉ.राजीव मुंदाने, राजेश गायनर, नारायण शेंडगे, अंबादास पाटे, रवीपाल गंधे आदी उपस्थित होते.
अहल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार डॉ.महात्मे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
खासदार डॉ.महात्मे म्हणाले, वेळ, पैसा व श्रमाची बचत व्हावी, एकाच व्यासपीठावर पाहणी करून मुलामुलींची निवड करता यावी, यासाठी परिचय मेळाव्याची गरज आहे. लता खांदवे यांनीही विचार मांडले.
प्रास्ताविक कृष्णराव कांबळे, संचालन अविनाश जानकर, रमेश जारंडे, राजेश मदने यांनी तर आभार मधुकर चिव्हाणे यांनी मानले. मेळाव्यासाठी पांडुरंग चितळकर, सुनील बोदे, बिपीन उघडे, अनंत कोरडे, पवन थोटे, संगीता जानकर, सुवर्णा देवकते, गणेश रूपनर, अजय देवकते, प्रशांत मासाळ, ज्ञानेश्वर डोळस, शिवचरण कोल्हे, अनिरुद्ध मुंदाने, अनिल पारखे, अनिल टोनचर, राजेश नखाते यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)