दारव्हा येथे धम्म परिषद

By Admin | Updated: January 15, 2017 01:09 IST2017-01-15T01:09:15+5:302017-01-15T01:09:15+5:30

महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा

Dhamma Parishad at Darwha | दारव्हा येथे धम्म परिषद

दारव्हा येथे धम्म परिषद

विविध कार्यक्रम : बौद्ध धम्मदीक्षा घेणाऱ्यांचा सत्कार
दारव्हा : महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी येथे चौथी धम्म परिषद घेण्यात आली. या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याबद्दल सचिन मुधोळकर, दीपाली मुधोळकर, सार्थक मुधोळकर यांचा सत्कार करण्यात आला.
विद्या प्रसारक मंडळ दारव्हा व बाळासाहेब घुईखेडकर फाऊंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली. उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उत्तमराव शेळके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेव भगत, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रमेश इंगोले, भन्ते बी. संघपाल, भन्ते कश्यप, भन्ते आनंद तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये, अ‍ॅड. शंकरराव राठोड, अनुताई गडपायले, सुभाष ठोकळ, डॉ. संगीता घुईखेडकर, प्राचार्य विलास राऊत, शिवरामजी कटके, बाळासाहेब सोनोने, स्वागताध्यक्ष वसंत घुईखेडकर आदी उपस्थित होते.
यावेळी भन्ते बी.संघपाल यांनी वारकरी संप्रदायातील संत तुकाराम यांच्या विचाराचे संदर्भ देऊन तथागत गौतम बुद्धांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये यांनीही विचार व्यक्त केले. स्वागताध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी दरवर्षी धम्म परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा यावेळी केली.
सायंकाळी बापूराव रंगारी लिखित व माणिकराव ढोरे दिग्दर्शित ‘क्षमा कर पुन्हा ये’ हे दोन अंकी नाटक सादर केले. कार्यक्रमाला प्रकाश घरडे, गणेश म्हातारमारे, नामदेवराव खोब्रागडे, ए.एच. जुमळे, प्रा. सिद्धार्थ गायकवाड, सुधाकर तायडे, वसंतराव पाटील, आर.के. कांबळे, पुंडलिक शेंडे, जयकृष्ण बोरकर, शरद माहुरे, मेघनाथ भगत, वसंत मनवर, मधुकर मुधाणे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. प्रशांत बागेश्वर, खुशाल ढवळे, प्रा. अजाबराव खंडारे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी प्रा. अरविंद मनवर, प्रा. गौतम मनवर, प्रा. भागवत, प्रा. बोरकर, प्रा. घोडेस्वार, सुधीर सोनोने, विजय गजभिये, राजू मनवर, सुनील अगमे, भीमराव राऊत, गौतम भगत, मिलिंद आठवले, अंकुश पेठे, अंकुश वरठी, सुयोग पाटील, अश्विन कांबळे, भाऊ डोंगरे, सुरज तायडे, प्राची डेरे, अस्मिता डेरे, जयश्री खडसे, राणी निचळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dhamma Parishad at Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.