कुऱ्हा येथे धम्म परिषद

By Admin | Updated: March 24, 2017 02:13 IST2017-03-24T02:13:20+5:302017-03-24T02:13:20+5:30

समता सैनिक दल, डॉ. बी.आर. फाऊंडेशन आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने तळणी(कुऱ्हा) ता.आर्णी येथे २५ व २६ मार्च रोजी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Dhamma Council at Kurah | कुऱ्हा येथे धम्म परिषद

कुऱ्हा येथे धम्म परिषद

तळणी : समता सैनिक दल, डॉ. बी.आर. फाऊंडेशन आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने तळणी(कुऱ्हा) ता.आर्णी येथे २५ व २६ मार्च रोजी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, २५ मार्च रोजी भदन्त सदानंदजी महास्थवीर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व धम्म वंदनेने परिषदेला सुरुवात होईल. जनमाणसात नितीमूल्य रूजविण्याचे काम प्रबोधनात्मक कार्यक्रमातून भिक्खूसंघ करणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘मी भीमाचा दिवाना’ हे एकपात्री नाटक प्रकाश खडतडे सादर करतील. रविवार, २६ मार्चला भदन्त सुबोध, भदन्त धम्मानंद यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर परिसंवाद होईल. दुपारी ४ वाजता उपवर-वधू परिचय मेळावा, कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सोहळा होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. रात्री बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. परिषदेसाठी चिंतामण चहांदे, भीमराव डांगे, सुधाकर मेश्राम, सुखदेव भरणे, दुर्वास वाघमारे, सुधीर भरणे, दिलीप खडतडे, गणेश भरणे, श्रीकांत चहांदे, मारोती गजघाटे, प्रफुल्ल डांगे, विजय चहांदे, विजय जंगले, सुनील बोरकर आदी पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dhamma Council at Kurah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.