धम्म मानवी मनाला शुद्ध करतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:10 IST2017-10-06T23:10:02+5:302017-10-06T23:10:13+5:30
तथागत गौतम बुद्धाने दिलेला धम्म मनाला शुद्ध करतो आणि आचरणाने शुद्ध असलेल्या मनुष्याचा विकास होतो, असे प्रतिपादन भदंत दयानंद महाथेरो यांनी येथे केले.

धम्म मानवी मनाला शुद्ध करतो
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तथागत गौतम बुद्धाने दिलेला धम्म मनाला शुद्ध करतो आणि आचरणाने शुद्ध असलेल्या मनुष्याचा विकास होतो, असे प्रतिपादन भदंत दयानंद महाथेरो यांनी येथे केले.
स्थानिक सुमेधबोधी धम्म प्रसारक मंडळ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने आयोजित वर्षावास समाप्ती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुमेधबोधी धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल काळबांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल धुळधुळे, श्यामराव केवटे उपस्थित होते. आपल्या धम्मदेसनेत भदंत दयानंद यांनी दु:खाची मूळ कारणे व ती नष्ट करण्यासाठी तथागतांनी दिलेला सम्यक मार्ग यावर सविस्तर विवेचन केले. या वेळी महिला मंडळातर्फे साडी-चोळी देऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनकर्त्या संगीता सुभाष बरडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भिक्षू संघाला चिवरदान करण्यात आले. पुणे येथे अपघातात जखमी झालेल्या अपेक्षा मुनेश्वर हिला मदत करण्याचे आवाहन डॉ. वंदना वानखेडे यांनी केले.
संचालन आत्माराम हापसे यांनी, आभार श्यामराव केवटे यांनी मानले. डॉ. नंदकुमार कांबळे यांनी वर्षावासानिमित्त भोजनदान दिले. कार्यक्रमासाठी संतोष नेथळे, भीमराव सोनुले, केशवराव मिसळे, राम कांबळे, वसंत भरणे, लक्ष्मण कांबळे, व्ही.आर. कांबळे, खिल्लारे, शारदा निथळे, मायादेवी हापसे, जिजा लोमटे, रमा भरणे, प्रज्ञा हापसे, अनिता पाटील यांनी सहकार्य केले.