दारव्हा रोडवर अपघातात ढाबा चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:46 IST2018-11-12T21:45:51+5:302018-11-12T21:46:08+5:30
एसटी बस व इंडिकाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ढाबाचालक ठार झाला. ही घटना रविवारी रात्री दारव्हा मार्गावरील इचोरी गावाजवळ घडली. अंबादास गणपतराव हिरटकर रा. लोहारा, असे मृताचे नाव आहे.

दारव्हा रोडवर अपघातात ढाबा चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : एसटी बस व इंडिकाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ढाबाचालक ठार झाला. ही घटना रविवारी रात्री दारव्हा मार्गावरील इचोरी गावाजवळ घडली. अंबादास गणपतराव हिरटकर रा. लोहारा, असे मृताचे नाव आहे.
अंबादास हिरटकर हे जामवाडी येथील एंजॉय ढाब्याचे चालक आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास ढाबा बंद करून इंडिकाने (एमएच २९ एडी ४४१) यवतमाळकडे येत होते. दरम्यान, नागपूर-परभणी बस (एमएच २० बीएल २६९७) मार्गात होती. कार आणि बसमध्ये इचोरी गावाजवळ धडक झाली. यात अंबादास हिरटकर हे ठार झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा प्रितम, दोन मुली व आप्त परिवार आहे.