आठ ग्रामपंचायतींचा विकास आराखडा

By Admin | Updated: January 31, 2016 02:31 IST2016-01-31T02:31:59+5:302016-01-31T02:31:59+5:30

नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे.

Development Plan for eight Gram Panchayats | आठ ग्रामपंचायतींचा विकास आराखडा

आठ ग्रामपंचायतींचा विकास आराखडा

विशेष सभा : यवतमाळ नगरपरिषद
यवतमाळ : नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. या सभेत १२ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यात १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त अनुदानातील विकास आराखड्याला मान्यता देण्यात येणार आहे.
नगरपरिषद क्षेत्रात लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहे. या ठिकाणी विकास कामे करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्याच्या व्यवस्थापनाकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला जाणार आहे. शहराला अमृत योजनेतून हरित पट्टा उद्यान तयार करण्यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या बाबत चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण समिती स्थापन केली जाणार आहे. खासदार निधीतून हायमास्ट लावण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता आमदार निधीतून एलईडी लाईट लावण्यास मान्यता, विकास आराखड्यांतर्गत दाते कॉलेज मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाला मान्यता, अग्निशामक नूतनीकरण सुरक्षा प्रमाणपत्राकरिता घेण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. तलावफैलातून जाणारा पाटीपुरा, सुराणा ले-आऊट व माळीपुरा भागातून जाणाऱ्या नाल्याला विकसित करण्यासाठी विकास आराखड्यात फेरबदल प्रस्ताव सभेपुढे ठेवला जाणार आहे. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. आठवडीबाजारात नवीन मत्स्य बाजारपेठेत शीतगृह आणि बर्फ कारखाना उभारण्याच्या प्रस्तावालाही सभेपुढे ठेवले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Development Plan for eight Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.