ग्रामपंचायतीविना गावांचा विकास गोलमाल
By Admin | Updated: February 9, 2015 23:20 IST2015-02-09T23:20:23+5:302015-02-09T23:20:23+5:30
राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ

ग्रामपंचायतीविना गावांचा विकास गोलमाल
यवतमाळ : राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर झरीजामणी, मारेगाव या मागास तालुक्यांचा क्रमांक लागतो. विकासाच्या नावाने राजकारण करणाऱ्या मंत्र्यांना व दक्ष असल्याचे शेखी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना ही अडचण कधीच सोडवाविशी वाटली नाही. यामुळेच आज ग्रामपंचायत नसलेल्या या गावांची पुरती वाट लागलेली आहे.
यवतमाळ तालुक्यातील नारकुंड, दिघोरी, उमरठा, भोयर या गावांमध्येच ग्रामपंचायती स्थापन झाली नाही. येथील कामकाज केवळ प्रशासकाच्या भरवशावर सुरू आहे. स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतरही या गावांमधील सत्ता विकेंद्रीकरण आणि घटना दुरुस्तीने अस्तित्वात आलेला पंचायतराज पोहोचलेच नाही. या गावांना हक्काची ग्रामसभा मिळालीच नाही. त्यामुळे तेथील स्थितीही अतिशय बिकट आहे. टप्प्या टप्प्याने मिळालेला विकास त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकला नाही. बाभूळगाव तालुक्यातील कोठा (फत्तेपूर), कोल्ही, दिघी, भटमार्ग या पुनर्वसित गावांची स्थिती आहे. मारेगाव तालुक्यातील इंदिरा ग्राम, उमरखेडमधील नागापूर (रूपाळा), आर्णी तालुक्यातील सुभाषनगर (बारभाई) या नव्याने अस्तित्वात आलेल्या गावांनासुद्धा ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)