शहराच्या विकासासाठी भासते निधीची चणचण

By Admin | Updated: August 27, 2014 23:53 IST2014-08-27T23:53:40+5:302014-08-27T23:53:40+5:30

शहराच्या विकास कामांसाठी निधीची चणचण भासत आहे. विकासाला मोठ्या निधीची गरज आहे़ निधी देण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.

For the development of the city, | शहराच्या विकासासाठी भासते निधीची चणचण

शहराच्या विकासासाठी भासते निधीची चणचण

वणी : शहराच्या विकास कामांसाठी निधीची चणचण भासत आहे. विकासाला मोठ्या निधीची गरज आहे़ निधी देण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.
वणी शहरात रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, प्रकाश योजना, या सर्वच विभागात प्रचंड अनुशेष निर्माण झाला आहे़ शहरातील एकही रस्ता धड नाही. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पाणी पुरवठ्याही विविध अडवणी आहेत. नाल्यांची कमतरता आहे. रस्त्यांच्या सुधारणेची गरज आहे. त्यासाठी नगरपरिषदेला निधीची प्रचंड चणचण जावणत आहे. निधीअभावी शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.
सध्या तेराव्या वित्त आयोगातून पाईप ड्रेनची तीन कोटी रूपयांची कामे नगरपरिषदेतर्फे सुरू आहेत़ नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत विविध प्रभागात दोन कोटींची विविध कामे मंजूर झाली आहेत़ शहरातील प्रगतीनगरमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम आता सुरू झाले आहे़ जलनिस्सारण पाण्याच्या टाकीला ४४ लाख रूपयांची संरक्षक भिंत बांधली जात आहे़ नगर उत्थात निधी अंतर्गत ४५ कोटींचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहे़ यात प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचा समावेश आहे. यामध्ये सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात सुचविलेल्या विविध कामांचा समोवश आहे.
नागरी दलित वस्ती सुधार निधीतून विकास कामे राबविण्यासाठी तब्बल पाच कोटींची गरज आहे. नगर उत्थान निधीतून शहरात चार कोटींचे विकास कामे करावयाची आहेत. तसेच वैशिष्टपूर्ण निधीतून भरीव निधीची नगरपरिषदेला गरज आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती निधीतून पाच कोटी रूपये शहराच्या विकासासाठी आवश्यक आहे. शहरातील मटन मार्केट निर्मितीसाठी एक कोटी रूपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. एवढा निधी मिळाल्यास शहरातील विकास कामांना चालना मिळणार आहे. त्यातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे हा निधी तातडीने नगरपरिषदेला उपलब्ध करून द्यावा, असे साकडे पालकमंत्र्यांना घालण्यात आले आहे. त्यासाठी बांधकाम सभापती धनराज भोंगळे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष अशोक बुरडकर, नगरसेवक पीक़े़ टोंगे, विनोद निमकर यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: For the development of the city,