सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा मंचचा निर्धार

By Admin | Updated: October 6, 2015 03:20 IST2015-10-06T03:20:52+5:302015-10-06T03:20:52+5:30

पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी

Determination of continuation of satyagraha | सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा मंचचा निर्धार

सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा मंचचा निर्धार

पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट दिली. त्यावेळी अन्नत्याग सत्याग्रह थांबवा, अशी विनंती केली. मात्र लोकहितार्थ निर्धारित तारखेपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्धार पुसद विकास मंचने यावेळी केला.
अन्नत्याग सत्याग्रहाच्या चौथ्या दिवशी पुसद विकास मंचचे अ‍ॅड.सचिन नाईक, शाकीब शहा, अभिलेश खैरमोडे यांच्यासह पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.वजाहत मिर्झा, महेंद्र मस्के ही मंडळी या सत्याग्रहात सहभागी झाली आहे. चार दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करणारे अ‍ॅड.सचिन नाईक यांची प्रकृती खालावली. सोमवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ठेंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रतिराव राऊत, पंचायत समिती उपसभापती विवेक मस्के, जिल्हा परिषद सदस्य माधवी पाटील, साहेबराव कदम, सीताराम ठाकरे, गुलाबराव जाधव, गोदावरी जाधव, आशाताई पांडे, आशा चव्हाण, अ‍ॅड.माधव माने, दीपक आसेगावकर, डॉ.उत्तम रुद्रवार, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, महेश खडसे यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.
दरम्यान, माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाची कठोर भूमिका घेतली. पुसद जिल्हा करण्यास मी स्वत: विकास मंचच्या चळवळीत सहभागी आहे. मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन पुसद जिल्हा निर्मितीबाबत चर्चा करू. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत पुसद विकास मंचची बैठक घडवून आणणार आहो. या बैठकीला आपण उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले. नेते, समाजसेवी मोठ्या संख्येने सत्याग्रहाला भेट देवून जिल्हा निर्मितीला पाठिंबा दर्शवित आहे. बार असोसिएशनने जिल्हा निर्मितीचा ठराव करून विकास मंचच्या सुपूर्द केला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.कैलास राठोड, अ‍ॅड.माधवराव माने, अ‍ॅड.प्रशांत देशमुख, अ‍ॅड.विवेक पांडे, अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निशांत बयास, धनंजय सोनी, अभय गडम, पंकज पारधे, राहुल कांबळे, किरण देशमुख, नारायण पुलाते, कैलास जगताप, रवी ग्यानचंदाणी, सुरज डुबेवार, संजय भंडारी, निखिल चिद्दरवार, अ‍ॅड. नसरूल्ला खान, अजय क्षीरसागर, देवेंद्र खडसे, डॉ.उमेश रेवणवार आदी परिश्रम घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Determination of continuation of satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.