लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कधी काळी डिटेक्शनमध्ये माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या काही महिन्यात गंभीर गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा जोरात धडाका लावला आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेचे प्रमाण वाढले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी एलसीबीची धुरा सांभाळल्यापासून डिटेक्शनची ही गती प्रचंड वाढल्याचे मानले जाते.आठ महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्यावर विश्वास दाखविला. त्यांच्याकडे एलसीबीची जबाबदारी सोपविली गेली. कुलकर्णी यांनी सुरुवातीला काही दिवस अभ्यास करून लगेच परफॉर्मन्स दाखविणे सुरू केले. त्यांच्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे अधिनस्त यंत्रणेनेही मरगळ झटकली. त्यांच्या वाढलेल्या कामाच्या गतीचे चांगले परिणामही अल्पावधीतच दिसू लागले. गेल्या आठ महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने एकूण सहा खुनाचे गुन्हे उघडकीस आणले. त्यापैकी दोनचे श्रेय टोळी विरोधी पोलीस पथकाला दिले जाते. गेल्या काही महिन्यात शहरात घडलेल्या १५ ते १६ खून व अन्य गुन्ह्यातील सर्व आरोपी एलसीबीने पकडल्याचे सांगितले जाते. दोन दरोडे, नऊ जबरी चोरी, ३५ ते ४० चोºया, ११ घरफोड्या एलसीबीने डिटेक्ट केल्या. तलवारी, देशीकट्टे पकडण्याचे २१ गुन्हे नोंदविले गेले. देशीकट्टे बाळगणारे आणखीही अनेक जण एलसीबीच्या रडारवर आहे. नवरात्रोत्सवापूर्वी त्यांना लॉकअपमध्ये पाहण्याची एलसीबीची व्युहरचना आहे. लातूर, मध्यप्रदेश कनेक्शनच्या आरोपींनाही एलसीबीने पकडून दिले. मुकुंद कुलकर्णी यांनी डिटेक्ट केलेल्या गुन्ह्यांमधील न्यायालयीन खटल्यात शिक्षेचा दर ८० टक्के पेक्षा अधिक आहे.गांजा पिणारे पहिल्यांदाच अटकगांजाची तस्करी, साठेबाजी, विक्री या विरोधात कारवाई झाली. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात पहिल्यांदाच एक-दोन नव्हे तर तब्बल २७ जणांविरुद्ध गांजा पिल्याप्रकरणी कारवाई केली. एलसीबीने गांजाच्या दोन मोठ्या धाडीही यशस्वी केल्या.आर्थिक गुन्हे शाखेकडे नऊ गुन्हेएलसीबीच्या अधिनस्त असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे २५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचे नऊ गुन्हे तपासाला आहेत. पोलीस निरीक्षक व सहायक निरीक्षक आणि त्यांची चमू हे तपास करीत आहे. राज्यस्तरीय व्याप्ती असलेल्या गुन्ह्यांचा तपास या शाखेकडे आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडे सहा गुन्ह्यांचा तपासएकेकाळी ७० ते ८० गुन्हे प्रलंबित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सध्या केवळ सहा गुन्ह्यांचा तपास शिल्लक आहे. त्यात सोनवाढोणा येथील बनावट रबरी शिक्के आणि कळंब येथील बनावट खते-कीटकनाशके या दोन प्रमुख प्रकरणांचा समावेश आहे.एलसीबीचे मनुष्यबळ वाढलेले नाही. पूर्वी एवढ्याच असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांच्या मदतीने चांगल्यात चांगले काम करून एसपींना रिझल्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर गुन्हा घडूच नये, आणि घडलाच तर तो लगेच डिटेक्ट व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.- मुकुंद कुलकर्णी,पोलीस निरीक्षक, एलसीबी
‘एलसीबी’त डिटेक्शनचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:19 IST
कधी काळी डिटेक्शनमध्ये माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या काही महिन्यात गंभीर गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा जोरात धडाका लावला आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेचे प्रमाण वाढले आहे.
‘एलसीबी’त डिटेक्शनचा धडाका
ठळक मुद्देअवघे आठ महिने : सहा खून, दोन दरोडे, नऊ वाटमारी, ४० चोऱ्या, ३१ शस्त्रे