विडूळ येथे ५० झाडे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST2021-03-16T04:42:14+5:302021-03-16T04:42:14+5:30
स्मशानभूमीत झाडे लावून त्याचे नियमित संगोपन होत असल्याचे पाहून अज्ञात विघ्नसंतोषी समाजकंटकाने आग लावली. वृक्षांची जाळपोळ केली. या आगीत ...

विडूळ येथे ५० झाडे खाक
स्मशानभूमीत झाडे लावून त्याचे नियमित संगोपन होत असल्याचे पाहून अज्ञात विघ्नसंतोषी समाजकंटकाने आग लावली. वृक्षांची जाळपोळ केली. या आगीत जवळपास ५० झाडे भस्मसात झाली. ५ ते ६ दिवस उलटूनही स्थानिक प्रशासनाला साधी चौकशी करायला वेळ मिळालेला नाही. येथील वृक्षप्रेमी भीमराव नगारे यांनी स्मशानभूमीत विविध प्रकारची सुमारे ५०० च्या जवळपास वृक्षे लावली आहेत. पाच ते सहा वर्षांपासून ते निगा राखतात. परंतु अज्ञात व्यक्तीने आग लावली.
ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांना हा प्रकार लक्षात आणून दिला असतानाही त्यांनी दखल घेतली नाही. लावलेली झाडे भस्मसात झाल्याचे दिसून येताच वृक्षप्रेमी नगारे यांना गहिवरून आले. तळहातावरील फोडाप्रमाणे निगा राखलेली झाडे जळाल्याने त्यांनी दु:ख व्यक्त केले.