कळंब खविसंवर देशमुख गटाचे वर्चस्व
By Admin | Updated: January 16, 2017 01:13 IST2017-01-16T01:13:23+5:302017-01-16T01:13:23+5:30
तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संघावर प्रवीण देशमुख गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले.

कळंब खविसंवर देशमुख गटाचे वर्चस्व
कळंब : तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संघावर प्रवीण देशमुख गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. या गटाने सर्व १५ जागा जिंकल्या. सदर संस्थेची निवडणूक रविवारी होवून लगेच मतमोजणी घेण्यात आली.
विजयी उमेदवारांमध्ये संलग्न सहकारी संस्था मतदार संघातून विद्यमान अध्यक्ष दत्तकुमार वासुदेव दरणे, मंगेश प्रभाकर होरे, सचिन चिंतामण शेंडे, प्रदीप गुणवंत झोटिंग यांचा समावेश आहे. वैयक्तिक मतदार संघातून प्रवीण अण्णाजी खडसे, अरुण नथ्थोबाजी लांडगे, रवींद्र अनिल मांडवकर, शंकर झुंगरु निकोडे, नितीन गणेश पराते, विठ्ठल अंबादास साळवे यांचा विजय झाला आहे. महिला राखीव मतदार संघातून रेखा प्रकाश भिसे, आशा झन्नाजी नंदुरकर या अविरोध निवडून आल्या. इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून केशव पांडुरंग नागतोडे हे अविरोध निवडून आले. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून विद्यमान उपाध्यक्ष सुदाम जेमाजी पवार हे अविरोध निवडून आले. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून सुरेश वामनराव चिंचोळकर यांची अविरोध निवड झाली आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा.वसंत पुरके गटाने आश्चर्यकारकरीत्या सर्वच्या-सर्व अर्ज परत घेतले. त्यामुळे एकतर्फी ताबा मिळविण्याचा प्रवीण देशमुख गटाचा मार्ग मोकळा झाला होता. आजच्या निकालानंतर तिसऱ्यांदा प्रवीण देशमुख गटाने खरेदी विक्री संघावर विजयी हॅटट्रिक साधली. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
या निवडणुकीत अशोक माणिकलाल जयस्वाल, अशोक मोतीराम उमरतकर व दिनकर चंद्रभान देवतळे हे तिनच अपक्ष रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.टी. वडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एम. नाईक यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)