कृषी साहित्याच्या लाभापासून वंचित

By Admin | Updated: July 23, 2015 02:31 IST2015-07-23T02:31:20+5:302015-07-23T02:31:20+5:30

जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार अल्पभूधारक व दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्याचे वाटप केल्या जाते.

Deprived of the benefit of agricultural literature | कृषी साहित्याच्या लाभापासून वंचित

कृषी साहित्याच्या लाभापासून वंचित

निकषाला डावलले : सधन शेतकऱ्यांचा केला यादीत समावेश
फुलसावंगी : जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार अल्पभूधारक व दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्याचे वाटप केल्या जाते. फुलसावंगी सर्कलमध्ये १८२ शेतकऱ्यांना कृषी साहित्य वाटण्यात आले. परंतु शासनाच्या निकषांना बगल देऊन अनेक गावातील पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले.
एकीकडे लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या छोट्याशा भांब या गावातून ४६ शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. फुलसावंगी सर्कलमध्ये २० ते २२ गावांचा समावेश आहे.
या परिसरातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक व दारिद्र्यरेषेखालील आहे. अशा शेतकऱ्यांना कृषी साहित्य मोफत देण्यासाठी दरवर्षी अर्ज मागविले जातात. यावर्षी मात्र या प्रक्रियेत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. केवळ निकटवर्तीय शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. निकषांना डावलून सधन शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Deprived of the benefit of agricultural literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.