कृषी विभागाच्या फाईल चक्क खड्ड्यात

By Admin | Updated: July 6, 2015 02:47 IST2015-07-06T02:47:45+5:302015-07-06T02:47:45+5:30

शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या राळेगाव तालुका कृषी विभागाच्या फाईल चक्क एका खड्ड्यात आढळून आल्या.

Department of Agriculture Department in the pothole | कृषी विभागाच्या फाईल चक्क खड्ड्यात

कृषी विभागाच्या फाईल चक्क खड्ड्यात

राळेगावातील प्रकार : फाईल पोलिसात जमा
राळेगाव : शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या राळेगाव तालुका कृषी विभागाच्या फाईल चक्क एका खड्ड्यात आढळून आल्या. बेवारस स्थितीत आढळलेल्या पाच फाईल राळेगाव पोलीस ठाण्यात जागरुक नागरिकाने जमा केल्या. या घटनेने कृषी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राळेगाव येथील पंचायत समितीच्या मागच्या बाजूने एका खड्ड्यात पडलेल्या काही फाईल जागरुक नागरिक संजय दुरबुडे यांना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दिसून आल्या. त्यांनी या फाईल कशाच्या म्हणून बघितल्या असता त्यावर राळेगाव तालुका कृषी अधिकारी असा मजकूर आढळून आला. उत्सुकता म्हणून फाईल उघडून बघितल्या असता पाच शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या त्या फाईल होत्या. फाईलमध्ये कार्यालयाचा मोक्का तपासणी अहवाल, सूक्ष्म सिंचन मंजुरी आदेश, शेतकऱ्यांच्या नोंदी असणारे नकाशे, सातबारा, कृषी अधिकारी अहवाल, त्यावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची शासकीय मुद्रा असलेली सही, शिक्का आदी दिसून आले. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकरिता कृषी अधिकारी कार्यालयात विविध योजनेसाठी ही कागदपत्रे सादर केली असावी. कार्यालयाने या कागदपत्रांची फाईल तयार केली. मात्र या फाईली खड्ड्यात आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे कार्यालयातील कोणत्याही फाईल संबंधित विभागाने जपून ठेवणे आवश्यक असते. शासकीय दस्ताऐवजाची जपणूक ही जबाबदारी संबंधित कार्यालयाची असते. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या या फाईली खड्ड्यात फेकल्या की कुणी जाणीवपूर्वक नेऊन टाकल्या हे मात्र कळायला मार्ग नाही. संजय दुरबुडे यांनी या फाईल राळेगाव पोलीस ठाण्यात नेऊन जमा केल्या. दरम्यान याबाबत तालुका कृषी अधिकारी एन.आर. कुंभरे यांना विचारणा केली असता कृषी अधिकारी कार्यालय दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करणे सुरू आहे. फाईल त्या कार्यालयात नेताना कोठे तरी रस्त्यात पडल्या असतील, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)

Web Title: Department of Agriculture Department in the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.