शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दाट जंगल, त्यात वाघ अन् आता अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:33 IST

कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.

ठळक मुद्दे१४ तासांचे अघोरी भारनियमन : वाघग्रस्त गावकऱ्यांनी बाईक रॅली काढून मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, झाडकिन्ही, किनवट, अंतरगाव, मेटिखेडा, पिंपळशेंडा या गावातील नागरिकांनी गुरूवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी केली. या भागामध्ये वाघाची चांगलीच दहशत आहे. यातील पिंपळशेंडा गावात वाघाने एका व्यक्तीला ठार केले होेते. अलीकडे चार ते पाच दिवसांपासून या भागात वाघ दिसल्याची चर्चा आहे. यासोबतच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने दवंडी देऊन शेतशिवाराकडे जाण्यास मज्जाव केला आहे.अशा स्थितीत रात्रीला भारनियमन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गावांनी कृषी फिडरवर टाकण्यात आले आहे. यामुळे या गावामध्ये १४ तासाचे भारनियमन होत आहे. भारनियमनाच्या ‘शेड्यूल’ व्यतिरिक्त होणारे भारनियमन वेगळेच आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी आम्ही गावात राहायचे की नाही, असा थेट प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकांना विचारला.या भागात सकाळी ७ ते सायंकाळी चारपर्यंत वीज नसते. सायंकाळी ७ पासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा वीज गुल असते. याच अंधारात वाघ गावामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यातूनच संपूर्ण गाव दहशतीत आहे. शेतीकरिता रात्रीलाच वीज दिली जाते. या भागात वाघ असल्याची दहशत आहे. यामुळे शेतामधील ओलित थांबले आहे. कापूस, तूर आणि रब्बीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. गावामधील दहशत दूर करण्यासाठी रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.यावेळी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विजय राठोड, कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, डोंगरखर्डाचे सरपंच निश्चल ठाकरे, सुरेंद्र चिंचोळकर, सुधाकर निखाडे, गणेश जाधव, रतीलाल पवार, दरणे पाटील, देवानंद वरफडे, प्रमोद मुनेश्वर, शेख आरीफ, विनोद पंचबुध्दे, सुभाष काकडे, शामलाल जयस्वाल, सिध्दार्थ पाटील, रमेश काचोरे, विठ्ठल येबरे, शेख सादीक उपस्थित होते.ऊर्जा राज्यमंत्र्यांचे उपाययोजनेचे आदेशवाघाच्या दहशतीमुळे कळंब तालुक्यातील अनेक गावे दडपणात आहे. अशा वेळी भारनियमन होत असल्याने भीती वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यापुढे मांडली. त्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात भारनियमन न थांबल्यास आंदोलनाचा इशारा गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघelectricityवीज