अपमानास्पद विधानाचा बसपातर्फे निषेध
By Admin | Updated: July 23, 2016 00:11 IST2016-07-23T00:11:03+5:302016-07-23T00:11:03+5:30
बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल भाजपाचे उत्तरप्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अपमानास्पद विधान केल्यामुळे

अपमानास्पद विधानाचा बसपातर्फे निषेध
वणी : बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल भाजपाचे उत्तरप्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अपमानास्पद विधान केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी येथील बहुजन समाज पार्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने महिला लोकप्रतिनिधींबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य करणे, ही पदाधिकाऱ्यांची बौद्धीक दिवाळखोरी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विकृत मानसीकता असलेल्या अशा बेलगाम पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, त्यांच्यावर कलम ३५४, २९४ नुसार कारवाई करण्यात यावी, हा दावा जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, दयाशंकर सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासह विविधि मागण्यांचे निवेदन बहुजन समाज पार्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रंतप्रधानांकडे पाठविले आहे.
निवेदन देतेवेळी वणी विधानसभा अध्यक्ष अशोक भगत, बसपाचे महासचिव अरूण कळे, जानबा वाघमारे, अंकुश पेटकर, शंकर गड्डमवार, राकेश वाघमारे, प्रवीण घानझोडे, विजय नगराळे, पंकज कांबळे, आकाश अंबागडे, संजय गोवर्धन, प्रल्हा कोठार बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)