राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची कचेरीसमोर निदर्शने
By Admin | Updated: December 28, 2016 00:21 IST2016-12-28T00:21:47+5:302016-12-28T00:21:47+5:30
प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची कचेरीसमोर निदर्शने
यवतमाळ : प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे. या संपाच्यादृष्टीने मंगळवारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करून निवेदन सादर केले.
९ डिसेंबरला मुंबईत झालेल्या समन्वय समितीच्या सभेत या संपाबाबत संघटनेचा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. त्यासोबतच नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करा, रिक्त पदे तत्काळ भरा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचरांना किमान वेतन १० हजार रुपये द्या आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणीस नंदकुमार बुटे, किशोर पोहनकर, श्रीरंग रेकलवार, विजय साबापुरे, गजानन टाके, निशांत नागरगोजे, प्रमोद पोहेकर, सुभाष वानरे, नंदरकुमार नेटके, शिलाताई पेंडणेकर, शरद निबुदे, राजेंद्र गावंडे, नरेंद्र राऊत आदींनी दिली. (शहर वार्ताहर)