दानवेंच्या वक्तव्याचा निषेध

By Admin | Updated: May 13, 2017 00:32 IST2017-05-13T00:32:52+5:302017-05-13T00:32:52+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडने निषेध नोंदविला. येथील बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ

Demonic protest | दानवेंच्या वक्तव्याचा निषेध

दानवेंच्या वक्तव्याचा निषेध

संभाजी ब्रिगेड : घाटंजी, राळेगाव, कळंब येथे आंदोलन, निवेदन सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडने निषेध नोंदविला. येथील बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. दानवे यांना यवतमाळ जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे विधानसभा प्रमुख बिपीन चौधरी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. या आंदोलनात कैलास भोयर, देवेंद्र कळसकर, पराग पाटील, आकाश चंदनखेडे, सुरज खोब्रागडे, अमित नारसे, नितीन आगरकर, परीक्षित इंगोले, शेखर सावरकर आदी सहभागी झाले होते.
लोकजागृती मंचतर्फे निषेध
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा लोकजागृती मंचतर्फे निषेध करण्यात आला. ते वक्तव्य दानवेंनी भाजपाच्या अजेंड्यानुसारच केले, अशी टीका मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी केली.
तूर खरेदी प्रकरणी शेतकऱ्यांना अपमानित करणारे वक्तव्य दानवे यांनी जालना येथील कार्यक्रमात केले. अशी वक्तवे करणारे नेते भाजपमध्ये अनेक आहेत. तो त्यांच्या नितीचाच एक भाग आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशीच वक्तवे केली आहेत. परंतु, आज निषेध करणारे शेतकरी उद्या पुन्हा जाती, धर्माच्या नावावर भाजपालाच मतदान करणार असतील, तर हे नेते मस्तवाल बनतीलच, अशी खंतही देवानंद पवार यांनी व्यक्त केली.
दानवे व सरकारने माफी मागावी
घाटंजी : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. घाटंजी येथे प्राऊटिस्ट अंतर्गत किसान आझादी आंदोलनद्वारा निवासी नायब तहसीलदार संतोष गजभिये यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. रावसाहेब दानवे व सरकारने जाहीर माफी मागावी, दानवे यांच्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथे देण्यात आला. शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करण्याचा प्रकार वाढला आहे. यापूर्वी अशोक नेते यांनी शेतकऱ्यांविषयी अनुद्गार काढले होते. बेताल वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्राऊटिस्टने निवेदनातून केली आहे. यावेळी मधुकर निस्ताने, मोरेश्वर वातीले, हरिभाऊ पेंदोर, सुधाकर अक्कलवार, मोहन पवार, भूषण मेश्राम, राजू वीरदंडे, अमोल बहेकर, निखिल कचरे, प्रकाश कुमरे, गोपाल नामपेल्लीवार, देवराव मडकाम, गणपत लोणकर, विठोबा मंगाम, लक्ष्मण कांबळे, मयंक आत्राम, रामदास आडे, गोविंदा मेश्राम, माधव आत्राम, गुरुदेव आत्राम, श्यामराव आत्राम, प्रेमिला आत्राम, सुगंधा आत्राम यांची उपस्थिती होती.
पुतळ्याचे दहन
शिवसेनेच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुतळ्याला चपलांचा हार चढवून शहरातील मुख्य रस्त्याने फिरविण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख मनोज ढगले, युवा सेना तालुका प्रमुख आकाश राठोड, नीलेश चव्हाण, प्रशांत मस्के, राहुल आडे, संतोष पवार, संतोष धेनावत, हर्षल भोयर, भारत आडे, विशाल वातीले आदी यामध्ये सहभागी झाले.
राळेगाव येथे धरणे
राळेगाव : शेतकऱ्यांविषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा येथे निषेध नोंदविण्यात आला. येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आधीच दुर्लक्ष केले आहे. आता रावसाहेब दानवे यांनी बेताल वक्तव्य करून देशातील समस्त शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अ‍ॅड. फिडेल बायदाणी, अन्याय प्रतिकार मंचचे अध्यक्ष जानराव गिरी, प्रदीप ठुणे, विजयराज सेगेकर, प्रकाश खुडसंगे, राजू पुडके, नगरसेवक शशिकांत धुमाळ आदींची उपस्थिती होती.
कळंब तहसीलदारांना निवेदन
कळंब : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा येथे काँग्रेसतर्फे निषेध नोंदविण्यात आला. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, पंचायत समिती उपसभापती महादेव काळे, योगेश धांदे, राजू पड्डा, बसवेश्वर माहुलकर, विजय गेडाम, मधुकर लिल्लारे, बाळाभाऊ नित, अशोक रोकडे, सुभाष मेश्राम, विलास राठोड, अशोक उमरतकर, राजू कदम, आशीष कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Demonic protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.