रेल्वे मार्गासाठी भरीव तरतुदीची मागणी

By Admin | Updated: February 13, 2015 01:55 IST2015-02-13T01:55:45+5:302015-02-13T01:55:45+5:30

वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, अशा मागणीचे निवेदन उमरखेड ...

The demand for substantial provisions for the railway route | रेल्वे मार्गासाठी भरीव तरतुदीची मागणी

रेल्वे मार्गासाठी भरीव तरतुदीची मागणी

उमरखेड : वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, अशा मागणीचे निवेदन उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने देण्यात आले आहे.
दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या पुढाकारात तालुक्यातील सामाजिक व राजकीय पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी एक निवेदन वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी दिले. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी हा रेल्वे मार्ग तत्काळ होणे गरजेचे आहे.
त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, राम देवसरकर, राजू जयस्वाल, कृष्णापाटील देवसरकर, नितीन भुतडा, अ‍ॅड. संतोष जैन, बालाजी उदावंत, सुरेश माहेश्वरी, नगराध्यक्ष उषा आलट, वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक, प्राचार्य डॉ. वि.ना. कदम, बालाजी नरवाडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The demand for substantial provisions for the railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.