कळंबला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची मागणी
By Admin | Updated: May 17, 2014 00:30 IST2014-05-17T00:30:54+5:302014-05-17T00:30:54+5:30
महाराष्ट्र शासनाने नुकताच कळंब ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. परंतु कळंब शहराचा पसारा आणि व्याप्ती लक्षात घेता कळंबला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा,

कळंबला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची मागणी
कळंब : महाराष्ट्र शासनाने नुकताच कळंब ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. परंतु कळंब शहराचा पसारा आणि व्याप्ती लक्षात घेता कळंबला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कळंबवासीयांची आहे. यासाठी वारंवार ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनाही नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी कळंब ग्रामपंचायतने नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी एकमताने ठराव पारीत केला होता. यासाठी सत्तारुढ व विरोधी सदस्यही एकत्र आले होते. तसेच खासदार, आमदार व जिल्हा परिषद अध्यक्षाकडेही नगर परिषदेसाठी प्रयत्न करण्याकरिता वारंवार मागणी करण्यात येत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगर परिषदेऐवजी नगर पंचायतची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली. परंतु शासनाच्या या घोषणेचा कळंबवासीयांना फारसा आनंद झाला नाही. कळंब येथे अनेक शासकीय तसेच निमशासकीय विभागाचे स्वतंत्र्य कार्यालय आहे. कळंबची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पुनर्वसीत थाळेगावचा कळंब ग्रामपंचायतमध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यामुळे कळंब शहराच्या क्षेत्रफळात मोठी वाढ होणार आहे. सध्यस्थितीत शहराचा पाहीजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे नगर परिषदेचा दर्जा देऊन विकासाचा मार्ग सुकर करावा, अशी जनतेची मागणी आहे. कळंब तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. विशेष म्हणजे या तालुक्याचा समावेश आदिवासी राखीव मतदार संघामध्ये होतो. दिवसेंदिवस कळंब शहराचा विस्तार वेगाने वाढू लागला आहे. ले-आऊटचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरु लागले आहे. परंतु नागरिकांना पर्याप्त सुविधा पुरविताना ग्रामपंचायत अपुरी पडत आहे. अपुर्या सुविधा असलेल्या ले-आऊटचा भार ग्रामपंचायतवर पडत आहे. त्यामुळे ले-आऊट मान्यतेपुर्वी नियमानुसार सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच त्यांना मान्यता देणे गरजेचे आहे. या परिस्थितीत ग्रामपंचायतच्या र्मयादा लक्षात घेता नगर परिषदेची स्थापना करणे महत्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)