शिवणी कोळसा खाण सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:10+5:302021-08-13T04:48:10+5:30
तालुक्यात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एकही उद्योग नाही. त्यात शिवणी (धोबे) कोळसा खाणीची पहिली जनसुनावणी सन २०१३ ...

शिवणी कोळसा खाण सुरू करण्याची मागणी
तालुक्यात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एकही उद्योग नाही. त्यात शिवणी (धोबे) कोळसा खाणीची पहिली जनसुनावणी सन २०१३ मध्ये झाली होती. सेक्शन ४ लागू झाल्यानंतर सेक्शन ७ प्रस्ताव एम.ओ.सी.ला पाठविण्यात आला. त्यामुळे तालुक्यात पहिली कोळसा खाण शिवणी (धोबे) येथे सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. नंतर प्रक्रिया रखडल्याने कोळसा खाणीचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. याबाबत शिवनी (धोबे), कानेडा, मुक्टा या गावांतील ग्रामस्थांनी हंसराज अहिर यांची भेट घेत निवेदन दिले. शिवणी येथील कोळसा खाणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली. या वेळी संतोष जुमळे, प्रसाद ढवस, अजिंक्य काटवले, जगदीश काटवले, निखिल धाबेकर, नीलेश ढेंगळे, हरिदास काकडे, अक्षय बिडवाईक, गणेश किनाके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.