मुकटा-दांडगावमार्गे मार्डा बंधारा रस्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:47 IST2021-08-21T04:47:28+5:302021-08-21T04:47:28+5:30

मारेगाव तालुक्यातील मार्डी, कुंभा, हिवरा, वनोजादेवी या परिसरातील जनतेच्या सुविधेकरिता मार्डी ते वरोराकरिता हा रोड अतिशय सोयीचा असून, अंतर ...

Demand for Marda dam road via Mukta-Dandgaon | मुकटा-दांडगावमार्गे मार्डा बंधारा रस्त्याची मागणी

मुकटा-दांडगावमार्गे मार्डा बंधारा रस्त्याची मागणी

मारेगाव तालुक्यातील मार्डी, कुंभा, हिवरा, वनोजादेवी या परिसरातील जनतेच्या सुविधेकरिता मार्डी ते वरोराकरिता हा रोड अतिशय सोयीचा असून, अंतर २० किलोमीटर आहे. मार्डी येथून हिवरा (मजरा), मुकटा रोड आहे. मुकटा या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर वर्धा नदीवर बंधारा असून, या बंधाऱ्याच्या पुलावरून हलकी वाहतूक सुरू आहे. बंधारा ते दांडगाव अंतर एक किलोमीटर आहे. मुकटा व दांडगाव ही दोन गावे यामार्गे पक्क्या रस्त्याने जोडल्यास दांडगावमार्गे अथवा मुकटामार्गे वरोरा येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अतिशय सोयीचा आणि वेळ व खर्च यांचा अपव्यय टाळता येणार आहे. त्यामुळे जनतेच्या सुविधेकरिता मुकटा ते बंधारा ते दांडगाव या रोडचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Demand for Marda dam road via Mukta-Dandgaon