गारपीट नुकसानाच्या भरपाईची मागणी
By Admin | Updated: March 10, 2016 03:16 IST2016-03-10T03:16:45+5:302016-03-10T03:16:45+5:30
जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी वादळी पाऊस व प्रचंड गारपीट झाली. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गारपीट नुकसानाच्या भरपाईची मागणी
पुसद : जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी वादळी पाऊस व प्रचंड गारपीट झाली. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी शाखा पुसद यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, टरबूज, पपई, आंबे, संत्रा व भाजीपाला पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी डॉ.शेषराव सूर्यवंशी, डॉ.ओमप्रकाश काकन, विजय उबाळे, मारोती चव्हाण, उद्धव राजाराव, अतुल नागरे, अलमगिर खान, सिद्धार्थ सावळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)