शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

निवडणूक प्रचारानिमित्याने वाढली पेट्रोल डिझेलची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:21 IST

Yavatmal : इंधनाच्या मागणीत २० टक्क्यांनी झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : विधानसभा निवडणूक प्रचारात वाहनांच्या वापरावर निवडणूक आयोगाने मर्यादा आणल्या तरीही निवडणुकीत वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. महिनाभरात पेट्रोल-डिझेलच्या मागणीत २० टक्के वाढ झाली. तरीही असोसिएशनच्या रेकॉर्डवरून १० टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येते. यातून एका महिन्यात किमान ५० लाखांची उलाढाल वाढल्याचा अंदाज आहे.

महिनाभरात गळ्यात पक्षाचा स्कार्प, डोक्यावर पक्षाच्या रंगाची टोपी, पांढरी कपडे घालून बसलेले डबल, तिबल सीट कार्यकर्त्यांच्या दुचाकी गाड्या भरधाव वेगाने पंपात येतात. शंभर दोनशेची नोट देत पेट्रोल टाका, असा इशारा देतात. पेट्रोल भरताच पुढे आवडीच्या भागात रात्री उशिरापर्यंत फेऱ्या मारतात. असे दृश्य शहरासह ग्रामीण भागात दिसले. 

प्रत्येक तालुक्यातील एक-दोन पंपावर अशी स्थिती आहे. वणी तालुक्यात काही उमेदवारांनी आपल्या विश्वासू व्यक्तीकडे कार्यकर्त्यांना पेट्रोलसाठी 'रसद' पुरविण्याची जबाबदारी दिली. अशांनी कार्यकर्त्यांच्या गटाला ठराविक रसद द्यायची. 

ठरलेल्या पंपावर पेट्रोल भरण्याची सूचना केली की कार्यकर्ते पंपावर थेट जात होते. कार्यकर्त्यांना रसद पुरविण्याची जबाबदारी विश्वासूंनी पार पाडल्याने निवडणूक, पक्ष व उमेदवाराचा या बाबीशी थेट काही संबंध नाही, असे भासवले गेले. कार्यकर्त्यांनी रांगेत उभे राहून पेट्रोल भरून घेतले. ते बहुतेक सर्व मतदारांनी डोळे भरून पाहिले. ज्या पंपावर दोन चार वाहनांची रांग असते, तिथे दिवसातून दोन-तीन वेळा ठराविक कार्यकर्ते पेट्रोल भरायला येत होते. असे असूनही पेट्रोल पंपचालक मात्र पेट्रोलची मागणी व उलाढाल वाढलेली नाही, असे सांगत आहेत. त्यांचे सांगणे व दिसणारे वास्तव यात तफावत आहे. 

१० ते १५ टक्के मागणी वाढली इंधन कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर तालुक्यात सरासरी एका कंपनीच्या पेट्रोलमध्ये १० ते १५ टक्के मागणी वाढल्याचे सांगितले. दरमहा पेट्रोल साडेचार ते पाच लाख लिटर लागते. त्याऐवजी या महिन्यात साडेपाच लाख लिटरपर्यंत इंधनाची विक्री झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Petrolपेट्रोलDieselडिझेलInflationमहागाईYavatmalयवतमाळ