ई-फार्मसी प्रणाली बंदची मागणी

By Admin | Updated: July 21, 2015 01:49 IST2015-07-21T01:49:24+5:302015-07-21T01:49:24+5:30

आॅनलाईनच्या युगात विनाप्रिस्क्रिप्शन औषधी वितरण ही सुविधा अस्तित्वात आली. यामध्ये ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिक

Demand for e-pharmacy system closure | ई-फार्मसी प्रणाली बंदची मागणी

ई-फार्मसी प्रणाली बंदची मागणी

यवतमाळ : आॅनलाईनच्या युगात विनाप्रिस्क्रिप्शन औषधी वितरण ही सुविधा अस्तित्वात आली. यामध्ये ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्टचे पालन तर दूरच; वेळोवेळी नियमांची पायमल्ली होते. आरोग्यावर परिणाम करणारा हा प्रकार थांबविण्याची मागणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने केली आहे. ई-फार्मसीची पद्धत बंद करा, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांना देण्यात आले.
जुन्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णांना अल्प्राझोलम, कोडीनफॉस्फेटसारख्या नार्कोटिक औषधी पुरविणे कायद्याने गुन्हा ठरते. याच गुन्ह्यासाठी फार्मासिस्टला निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जावे लागते. तर आॅनलाईन सेवेत एकाच प्रिस्क्रिप्शनवर वेगवेगळ्या साईटवर वाटेल तेवढ्या प्रमाणात खरेदी करता येतात. यावर केंद्र सरकारचा कुठलाही अंकुश नाही, असे दिसते. एकीकडे ‘बेटी बचाव’ अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे. तर दुसरीकडे खुलेआम गर्भपाताच्या कीट ई-फार्मसीच्या माध्यमातून विकल्या जात आहे. अशा प्रकारच्या व्यवसायात फार्मासिस्ट, अ‍ॅव्हेलॅबिलीटी, पेशंट कौन्सलिंग व औषधांची गुणवत्ता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औषधी ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे त्यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. याच अनुषंगाने जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे अखिल भारतीय संघटनेचे सदस्य रमण अग्रवाल यांच्या उपस्थितीत खासदार भावना गवळी यांना निवेदन दिले. निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष पंकज नानवाणी, संजय पिंपळखुटे, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, संघटन सचिव अतुल ढोले, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण निमोदिया, अविनाश फरकुंडे, श्रीकांत खडतकर, प्रसाद चौधरी, विजय तोदी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Demand for e-pharmacy system closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.