अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST2021-09-21T04:47:57+5:302021-09-21T04:47:57+5:30
इमारतीत मोकाट जनावरांचे बस्तान मारेगाव : नगरपंचायतीच्या पार्किंग जागेत दररोज दहा-वीस मोकाट जनावरे ठाण मांडून असतात. त्यामुळे या ठिकाणी ...

अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईची मागणी
इमारतीत मोकाट जनावरांचे बस्तान
मारेगाव : नगरपंचायतीच्या पार्किंग जागेत दररोज दहा-वीस मोकाट जनावरे ठाण मांडून असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहने ठेवायलाही जागा उरत नाही, तसेच जनावरांच्या मलमूत्रामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे रोगराईत वाढ होत आहे. अगदी नगरपंचायतीच्या इमारतीत मोकाट जनावरे ठाण मांडून असताना, याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सोयाबीनचे पीक सापडले धोक्यात
मारेगाव : गेल्या एक महिन्यापासून संततधार पाऊस कोसळत असल्याने, काढणीस आलेली सोयाबीनचे पिके धोक्यात आले असून, कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांच्या उघाडीनंतर पावसाला सुरुवात झाल्याने, ही पिके हाताची जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे या वर्षीही शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साथीच्या आजारांनी काढले डोके वर
मारेगाव : तालुक्यात कोरोनाची भीती कमी झाली असताना, आता सर्दी, ताप, डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असून, साथ रोगाने ग्रस्त रुग्णांची गर्दी खासगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी वाढली आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढल्याने अनेकांना कोरोनाची भीती पुन्हा सतावू लागली आहे.