आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेची मागणी

By Admin | Updated: August 5, 2015 00:15 IST2015-08-05T00:15:32+5:302015-08-05T00:15:32+5:30

झरी तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मुकुटबन येथे १०८ रूग्णवाहिकेची मागणी होत आहे.

The demand for an ambulance in the health center | आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेची मागणी

आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेची मागणी

प्रसूतीच्याही संख्येत वाढ : रूग्णांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार
मुकुटबन : झरी तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मुकुटबन येथे १०८ रूग्णवाहिकेची मागणी होत आहे.
परिसरात नवनवीन उद्योग व सोबतच विविध कंपन्याचे आगमन होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नऊ उपकेंद्र येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप आता चांगलाच वाढला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज बाह्यरूग्ण विभागात किमान २०० रूग्ण येतात. त्याचबरोबर केंद्रात प्रसूतीच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. येथील आरोग्य केंद्राला एक १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्या आली आहे. मात्र तिचा केवळ प्रसूतीच्या महिलांना ने-आण करण्यासाठीच वापर होतो.
सध्या उपलब्ध रूग्णवाहिकेचा दुसऱ्या कोणत्याच कामासाठी वापर होत नाही. क्वचितप्रसंगी ती रूग्णवाहिका उपलब्ध असल्यास गरजू रूग्णांच्या मदतीला ती धावते. विशेष म्हणजे या रूग्णवाहिकेला कायमस्वरूपी चालकही नाही. येथील एका प्रशिक्षित चालकाला रोजंदारीवर बोलावून काम भागविले जात आहे. झरी तालुक्यातीलच शिबला येथे फारशी गरज नसताना १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका देण्यात आली आहे. तेथे भ्रमणध्वनी बरेचदा लागत नसल्यामुळे नेमका कुणाला फोन करून घटनेची माहिती द्यावी, हे कळत नाही. त्यामुळे नागरिकांसह रूग्णांना पेच पडतो.
मुकुटबन हे गाव आजूबाजूच्या अनेक गावांशी जोडलेले आहे. येथे दिवसभर बाजारपेठेत गर्दी असते. परिणामी येथे अपघाताची सतत शक्यता असते. एखादी घटना घडल्यानतंर येथील आरोग्य केदं्रात तत्काळ उपचार केला जातो. नुकताच मंगळवारी २८ जुलैला दुचाकीचा अपघात झाला. मांगलीजवळ हा अपघात घडला. घटनास्थळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाठवून जखमींना तत्काळ केंद्रात आणून उपचार करण्यात आले. १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध असती, तर त्यांच्यावर लगेच उपचार करून पुढील केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले असते. मात्र जखमींना खासगी वाहनाने पुढे पाठवावे लागले.
परिसरात लहान-मोठ्या घटना सतत घडत असतात. त्यातील जखमींना पुढील उपचारासाठी नेण्याकरिता १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची येथे नितांत गरज आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ क्रमांकाची अत्याधुनिक सुविधा असलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The demand for an ambulance in the health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.