शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:04 PM

येथील नगरपरिषदेत गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्याधिकारी आणि नगरसेवकांतील शीतयुद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नगरसेवक एकवटले : अविश्वास सभेची मागणी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील नगरपरिषदेत गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्याधिकारी आणि नगरसेवकांतील शीतयुद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले असून मुख्याधिकाऱ्यांना हटविण्याची जोरदार तयारी चालविली आहे. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास आणण्याचा पवित्राही या नगरसेवकांनी घेतला आहे.यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात, वार्डातील समस्या घेऊन गेलेल्या नगरसेवकांचे ऐकत नाही, मनमानी करतात यातूनच माजी बांधकाम सभापतींसोबत वाद झाला होता. या वादातून मुख्याधिकाºयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा सोमवारीही नगरपरिषदेत पहावयास मिळाली. गत काही दिवसांपासून नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष कांचन चौधरी यांना निवेदन दिले. तीन दिवसाच्या आत मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास ठराव घेण्यासाठी सभा बोलाविण्याची मागणी या निवेदनातून करण्यात येत आहे. भाजपाचे गटनेते विजय खडसे, काँग्रेसचे गटनेते, राष्ट्रवादीचे गटनेते, शिवसेनेचे दोन नगरसेवक, बसपाचे गटनेते गणेश धवने यांच्यासह ३५ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहे. नगराध्यक्ष नियोजन समितीच्या बैठकीत असल्याने निवेदन देण्यात आले नाही. मात्र भाजपाचे गटनेते विजय खडसे यांनी अध्यक्षांकडे निवेदन देऊन अविश्वास सभेची मागणी करणार असल्याचे सांगितले. आता नगरपरिषदेत नगरसेवक विरुद्ध मुख्याधिकारी असे वातावरण झाल्याने विकास खुंटणार आहे.पालिकेत पाणीटंचाई निवारणाची क्षमता नाहीयवतमाळ शहरातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी पालिका सक्षम नाही, आपल्या स्तरावरून जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करावे, असे निवेदन सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालकमंत्री मदन येरावार यांना दिले. नगरपरिषदेत भाजपा सत्ताधारी आहे. त्यानंतरही पालिकेच्या प्रशासकीय कामातील गोंधळ पाहून खुद्द नगरसेवकांनीच प्रशासनाकडून पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना करणे शक्य नसल्याचे कबूल केले. या निवेदनावर भाजपाचे गटनेते विजय खडसे, माजी आरोग्य सभापती नितीन गिरी यांच्यासह नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.नगरसेवकाला सीओंनी काढले बाहेरशहरातील पाणीटंचाईचा प्रश्न घेऊन गेलेल्या नगरसेवकाला मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी आपल्या कक्षाबाहेर काढण्याचा प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजता घडला. लोहारा येथील प्रिया रेसीडेन्सीमध्ये पाणीपुरवठा करणारा टँकर बंद करण्यात आला. त्यामुळे या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. हा टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकाच्या नेतृत्वात या भागातील ३० ते ३५ नागरिक मुख्याधिकाºयांच्या कक्षात धडकले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी तुम्ही माझ्याकडे का आलात आत्ताच्या आता बाहेर निघा, अशा शब्दात नगरसेवकाला आपल्या कक्षाबाहेर काढले. मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे नगरसेवक व उपस्थित नागरिकात प्रचंड रोष निर्माण झाला. यावेळी माजी बांधकाम सभापतीविरोधात मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक सुरू होती. त्यांना या घटनेची माहिती मिळताच सर्व नगरसेवक मुख्याधिकाºयांच्या कक्षात पोहोचले. यावेळी पाणीटंचाई संदर्भात मुख्याधिकाºयांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.