चाणीतील ३० अतिक्रमणे हटविली

By Admin | Updated: September 29, 2016 01:14 IST2016-09-29T01:14:42+5:302016-09-29T01:14:42+5:30

शहरी भागात राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम आता गावपातळीवरही सुरू झाली आहे.

Defect of 30 encroachments | चाणीतील ३० अतिक्रमणे हटविली

चाणीतील ३० अतिक्रमणे हटविली

पोलीस बंदोबस्त : पहिल्याच कारवाईने उडाली तारांबळ
दारव्हा : शहरी भागात राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम आता गावपातळीवरही सुरू झाली आहे. तालुक्यातील चाणी येथे अतिक्रमण हटविण्यासाठी बुलडोझर चालविण्यात आला. ३० अतिक्रमण काढण्यात आले. पोलिसांचा ताफा आणि मोठा फौजफाटा दाखल होऊन अतिक्रमण हटविण्याची या गावातील ही पहिलीच वेळ आहे.
चाणी ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला संरक्षण मागविण्यात आले होते. बुलडोझरच्या मदतीने काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे चांगलीच तारंबळ उडाली. ग्रामपंचायतीच्या जागेवरील ३० ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. यात रस्ते, देवस्थान आणि नालीवरील बांधकाम काढण्यात आले. मोहिमेचे चित्रिकरण करण्यात आले. अतिक्रमण काढण्यात आल्याने या गावातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
कारवाई करताना सरपंच विद्या ठोकळ, उपसरपंच सुरेश शाहू, सुशिल ठोकळ, शालिक पारधी, नबी राठोड, कलावती नेमाडे, वेणूबाई सोमकुंवर, नानीबाई टेकाम, पोलीस पाटील वृंदा मडावी, लाडखेडचे ठाणेदार रणधिर, वावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Defect of 30 encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.