दीपककुमार मीना नाशिकचे सीईओ
By Admin | Updated: May 9, 2017 01:15 IST2017-05-09T01:15:02+5:302017-05-09T01:15:02+5:30
येथील उपविभागीय महसूल अधिकारी दीपककुमार मीना (आयएएस) यांची नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपककुमार मीना नाशिकचे सीईओ
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील उपविभागीय महसूल अधिकारी दीपककुमार मीना (आयएएस) यांची नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले.
दीपककुमार मीना गेल्या दीड वर्षांपासून पांढरकवडा एसडीओ पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार होता. मीना यांनी आदिवासी विकास विभाग तसेच महसूल विभागातील अनेक गैरप्रकारांना चाप लावण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विकास विभागातील गैरप्रकार बऱ्यापैकी थांबले असले तरी काहींनी धूळफेक करून त्यातूनही पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. मीना यांच्या ताठर भूमिकेमुळेच काही आदिवासी विद्यार्थी त्यांच्या निर्णयांच्या विरोधात गेले. त्यातूनच आदिवासी विकास विभागाला आंदोलनांचा सामनाही करावा लागला.