दीपक दोंदल सन्मानित
By Admin | Updated: July 27, 2015 01:25 IST2015-07-27T01:25:36+5:302015-07-27T01:25:36+5:30
कळंब तालुक्याच्या कात्री येथील श्री महावीर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीपक गुलाबराव दोंदल यांना भारत

दीपक दोंदल सन्मानित
यवतमाळ : कळंब तालुक्याच्या कात्री येथील श्री महावीर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीपक गुलाबराव दोंदल यांना भारत स्काऊट आणि गाईड संस्था मुंबईचा राज्यस्तरावरील ‘बार टू मेडल आॅफ द मेरीट’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यातील केवळ १२ जणांना हा पुरस्कार मिळाला. यात दोंदल यांचा समावेश आहे. शुक्रवारी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्य संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे राज्य तथा राष्ट्रीय मुख्य आयुक्त भा.ई. नगराळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दीपक दोंदल यांनी सुमारे ३२ वर्षे स्काऊट मास्टर तथा यवतमाळ जिल्हा संस्था आणि महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेवर विविध पदावर काम केले आहे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. (वार्ताहर)