काँग्रेस प्रवेशाचा निर्णय कार्यकर्तेच घेतील

By Admin | Updated: September 5, 2015 01:30 IST2015-09-05T01:30:38+5:302015-09-05T01:30:38+5:30

मुंबईत आपल्या खासगी कामासाठी आपण गेलो असताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचा निरोप मिळाला.

The decision will be taken by the workers for the Congress entry | काँग्रेस प्रवेशाचा निर्णय कार्यकर्तेच घेतील

काँग्रेस प्रवेशाचा निर्णय कार्यकर्तेच घेतील

मुंबईत सदिच्छा भेट : दीपक आत्राम यांनी केले स्पष्ट
गडचिरोली : मुंबईत आपल्या खासगी कामासाठी आपण गेलो असताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचा निरोप मिळाला. त्यानुसार आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली, अशी माहिती अहेरीचे माजी अपक्ष आ. दीपक आत्राम यांनी दिली आहे.
खा. चव्हाण यांनी आपल्याला आपण सर्वजण मिळून काँग्रेस पक्षाचे काम करू, आपण एकाच वेळी राजकारणात होतो, असेही सांगितले. त्यावर आपण काहीही हरकत नाही, असे त्यांना म्हणालो. आपल्याला काँग्रेस पक्षस्तरावर काही जबाबदाऱ्याही दिल्या जातील, असेही खा. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आपण त्यांना आपल्या आदिवासी विद्यार्थी परिषदेचे अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आहेत व शेकडो कार्यकर्ते आहे. या सर्वांशी बोलून याबाबत निर्णय घेता येईल, असे सांगितले.
अद्याप आपला काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. काही तरी भूमिका यापुढच्या काळासाठी निश्चित करावी लागणार आहे. या सर्व कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी बोलून आपण याबाबत निर्णय घेऊ. ज्यावेळी निर्णय होईल, त्यावेळी त्याची माहिती आपल्या सर्वांना दिली जाईल. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असेही माजी आ. दीपक आत्राम यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमातून माजी आ. दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत वावड्या उठविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर दीपक आत्राम यांच्या या विधानाला बरेच महत्त्व राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The decision will be taken by the workers for the Congress entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.