लाजवंतीला मिळाले हक्काचे माहेर

By Admin | Updated: December 12, 2015 05:10 IST2015-12-12T05:10:24+5:302015-12-12T05:10:24+5:30

शंकरबाबा पापळकरांच्या लाजवंतीचा हल्दी आणि मेहंदीचा कार्यक्रम लोकमत सखी मंचच्या यजमानत्वाखाली येथील

The deceased's foremost mother's rights | लाजवंतीला मिळाले हक्काचे माहेर

लाजवंतीला मिळाले हक्काचे माहेर

यवतमाळ : शंकरबाबा पापळकरांच्या लाजवंतीचा हल्दी आणि मेहंदीचा कार्यक्रम लोकमत सखी मंचच्या यजमानत्वाखाली येथील दर्डा मातोश्री सभागृहात पार पडला. सामाजिकतेची किनार लाभलेल्या या सोहळ्यातून लाजवंतीला हक्काचे माहेर मिळाले. या कार्यक्रमासाठी अनेकांनी सहकार्य केले.
शंकरबाबांच्या लाजवंतीचा विवाह दिग्रस येथील श्रीराम सरमोकदम सोबत शनिवारी यवतमाळात पार पडत आहे. तत्पूर्वी गुरुवारी लाजवंतीचा हल्दी आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी अनेकांनी सहकार्य केले.
नटराज संगीत कला अकादमीचे किशोर सोनटक्के, बाबा चौधरी, आनंद भिसमोरे, प्रवीण मानकर, प्रकाश कुमरे, मुकुंद शेंडे यांनी या कार्यक्रमात संगीताची बाजू सांभाळली. तर पंकज बन्सीलाल जयस्वाल नेरवाले यांनी या समारंभाचे डेकोरेशन अत्यंत उत्तम पद्धतीने साकारले होते. नरेश उदावंत यांनी साऊंड सिस्टीम, माहेश्वरी बिछायत केंद्राचे पवन माहेश्वरी यांनी बिछायतची तर विलास परचाके यांनी या कार्यक्रमाच्या हार-फुलाची जबाबदारी पार पाडली. (नगर प्रतिनिधी)

शंकरबाबा पापळकर यांची लाडाकौतुकाची लेक लाजवंती हिचा हलदी आणि मेहंदीचा कार्यक्रम सखी मंचच्यावतीने यवतमाळच्या दर्डा मातोश्री सभागृहात पार पडला. त्यावेळी नटराज संगीत कला अकादमीच्या साथसंगतीत सखींनी हलदी आणि मेहंदीवर गीते गावून लाजवंतीला आशीर्वाद दिले.

Web Title: The deceased's foremost mother's rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.