खासगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:23 IST2017-08-27T23:23:24+5:302017-08-27T23:23:54+5:30
तालुक्याच्या उचेगाव येथील एका महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

खासगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्याच्या उचेगाव येथील एका महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. संगीता अमोल भांडेकर (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
प्रकृती बिघडल्याने संगीता भांडेकर यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती उचेगाव येथे कळताच संगीताचे नातेवाईक या रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
याप्रकरणी संगीताचा पती अमोल भांडेकर यांनी तक्रार दाखल केली. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी त्यांनी केली. तुर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.