खत पोहोचवणाऱ्या ट्रकचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:29 IST2020-06-01T14:29:25+5:302020-06-01T14:29:36+5:30

या प्रकाराची माहिती होताच सचिन कराळे, नानाभाऊ घोंगळे, इमरान आकबानी, सैयद जमील यांनी रुग्णालयात नेले.

Death of a truck driver delivering manure | खत पोहोचवणाऱ्या ट्रकचालकाचा मृत्यू

खत पोहोचवणाऱ्या ट्रकचालकाचा मृत्यू

यवतमाळ: परिसरात खत पोहोचविण्यासाठी आलेल्या नाशिकच्या ट्रकचालकाचा आकस्मिक मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी रात्री घडला. प्यारे मोहम्मद शेख (६०) रा.हिरवेनगर नाशिक असे मृताचे नाव आहे. 

नाशिक येथील सादप शेख अब्दुल रहीम यांच्या मालकीच्या ट्रकद्वारे (एम.एच.१६/सीए-००७५) प्यारे मोहम्मद शेख हे मांगलादेवी आणि नेर येथील खत घेवून आले होते. मांगलादेवी येथे जात असताना छातीत कळा सुरू झाल्याने त्यांनी अमरावती रोडवरील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ ट्रक थांबविला. थोडे बरे वाटायला लागल्याने त्यांनी वाहकाला खानावळीतून जेवण आणायला सांगितले. तो परत आला त्यावेळी चालक प्यारे मोहम्मद शेख हे निपचित पडून दिसले. 

या प्रकाराची माहिती होताच सचिन कराळे, नानाभाऊ घोंगळे, इमरान आकबानी, सैयद जमील यांनी रुग्णालयात नेले. याठिकाणी डॉ. प्रतीक खोडवे यांनी त्याला मृत घोषित केले. ठाणेदार प्रशांत मसराम यांनी रुग्णालयाला भेट दिली. या चालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही त्यांची चाचणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Death of a truck driver delivering manure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.