आॅटोरिक्षा अपघातात एक ठार, नऊ गंभीर

By Admin | Updated: July 29, 2015 02:23 IST2015-07-29T02:23:17+5:302015-07-29T02:23:17+5:30

भरधाव आटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक महिला मजूर ठार तर नऊ मजूर गंभीर जखमी झाले.

A dead, nine serious in the autorickshaw crash | आॅटोरिक्षा अपघातात एक ठार, नऊ गंभीर

आॅटोरिक्षा अपघातात एक ठार, नऊ गंभीर

बोरीअरबची घटना : रुग्णवाहिका तासभर उशिराने, श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्न अपघात
बोरीअरब : भरधाव आटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक महिला मजूर ठार तर नऊ मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता घडला. रुग्णवाहिका तब्बल एक तास उशिरा आल्याने दहाही मजूर घटनास्थळी विव्हळत होते.
नर्मदा तुकाराम मडावी (६०) रा. राजीव नगर बोरीअरब असे मृत महिलेचे नाव आहे. तर नाजीरखान अजाजखान पठाण (२५), पार्वताबाई किसन टेकाम (६०) यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात ताजबी लुकमान शहा (५०), शबुब्ता लुकमान शहा (१८), सीमा परवीन लुकमान शहा (२०), दुर्गा तुकाराम मडावी (३८), रुख्साना परवीन (५०) सर्व रा. राजीवनगर, बोरी अरब यांच्यासह नऊ जण जखमी झाले. मजुरांना घेऊन आॅटोरिक्षा (एमएच २९ व्ही ८३९३) मंगळवारी राजीवनगरकडे जात होता. त्यावेळी कला वाणिज्य महाविद्यालयासमोर आॅटोरिक्षाला कुत्रा आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आटोरिक्षा रस्त्याच्याकडेला जाऊन उलटला. यात दहा प्रवाशी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला बोलाविण्यात आले. परंतु तासभर अ‍ॅम्ब्ल्युलन्स आली नाही. दरम्यान तासभर जखमी घटनास्थळीच विव्हळत होते.
तासाभरानंतर जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी नर्मदा तुकाराम मडावी यांचा मृत्यू झाला. अ‍ॅम्ब्युलन्स वेळेवर आली असती तर तिचा प्राण वाचला असता अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे पोलीसही घटनास्थळावर उशिराच पोहोचले. (वार्ताहर)

Web Title: A dead, nine serious in the autorickshaw crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.