‘मेडिकल’मध्ये रक्त पिशवीच्या प्रवासाला लागतो दिवस

By Admin | Updated: August 2, 2015 02:23 IST2015-08-02T02:23:57+5:302015-08-02T02:23:57+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तपेढीतून प्रसूती वॉर्डात रक्तपिशवी पोहोचविण्यासाठी तब्बल एक दिवस लागतो.

Day of blood on 'Medical' blood bag | ‘मेडिकल’मध्ये रक्त पिशवीच्या प्रवासाला लागतो दिवस

‘मेडिकल’मध्ये रक्त पिशवीच्या प्रवासाला लागतो दिवस

रुग्णांची परवड : रक्तदात्याच्या शोधात अपंग पतीची धडपड
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तपेढीतून प्रसूती वॉर्डात रक्तपिशवी पोहोचविण्यासाठी तब्बल एक दिवस लागतो. प्रशासनावर कोणाचीच जरब नसून रुग्णसेवेचा डोलारा पूर्णत: कोलडमला आहे. तर दुसरीकडे एक अपंग पती आपल्या पत्नीसाठी हव्या असलेल्या रक्तगटाचा दाता शोधण्यासाठी संपूर्ण शहर पालथे घालूनही कोणालाच सहानुभूती दाखविता आली नाही.
गोरगरीब रुग्ण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा नाईलाजाने उबंरठा ओलांडतात. या परिसरात वेदनेचे भांडवल करणाऱ्यांनी बाजार मांडला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील संवेदनशिलता हरविली आहे. वशिल्याने आलेला रुग्णाला येथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. त्यातच तथाकथीत रुग्णसेवक सोबत असल्यास थेट नियमांना बगल देऊन उपचाराची तत्परता दाखविली जाते. कोणावर वेळेत उपचार होणे यावर आक्षेप घेता येणारच नाही. मात्र यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांवर अन्याय होतो. दैव बलवत्तर म्हणून असा रुग्ण तो कसाबसा बरा होऊन बाहेर पडतो.
महागाव तालुक्यातील राजुरा येथील अनिता रवी गायकवाड (२६) ही महिला शुक्रवारी सकाळी प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने डॉक्टरांनी रक्त द्यावे लागेल, दात्याची व्यवस्था करा, असा सल्ला रवी गायकवाड याला दिला. पायने अपंग असलेला रवी रक्तपेढीत आला. त्याला येथे बदली रक्तदाता दिल्याशिवाय रक्त मिळणार नाही, असे सांगण्यात आले. रवीने शनिवारी सकाळपासूनच रक्तदात्याच्या शोधासाठी पायपीट सुरू केली. मिळेल त्याची विनवणी करून लागला त्याच्या पत्नीला ‘बी’ निगेटीव्ह गटाचे रक्त हवे होते. ११ वाजाताच्या सुमारास तो एका शिक्षकाच्या संर्पकात आला. त्या शिक्षकाने रक्तपेढी गाठून रक्ताची व्यवस्था केली. मात्र त्यानंतरही दुपारी दोनपर्यंत रवीच्या पत्नीला रक्तच लावण्यात आले नाही. अनिताच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ७ इतके होते. अशाच स्थितीत तिला दुपारी प्रसवकळा सुरू झाल्या. पती एकीकडे वणवण भटकत होता.
या परिस्थीतीत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संवेदनशिलता दाखविण्यात आली नाही. रक्तपेढीत रक्त आरक्षित करूनही अनिताला रक्त लावण्यात आले नाही. रक्तपेढीतून रक्तपिशवी आणण्यासाठी तब्बल पाच तासाचा वेळ लागला. त्यासाठीसुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करावी लागली. यावरून रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारची प्रचिती येते. अनेकांना याचा वाईट अनुभव मेडिकलमध्ये येत असतो. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Day of blood on 'Medical' blood bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.