वसंतराव नाईकांच्या जन्मदिनीच कृषी दिन

By Admin | Updated: May 30, 2017 01:20 IST2017-05-30T01:20:09+5:302017-05-30T01:20:09+5:30

हरित व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन १ जुलै कृषी दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

The day of birth of Vasantrao Naik is as follows: | वसंतराव नाईकांच्या जन्मदिनीच कृषी दिन

वसंतराव नाईकांच्या जन्मदिनीच कृषी दिन

गोर सेनेची मागणी : १ जुलैच्या मतदार दिवस निर्णयाला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हरित व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन १ जुलै कृषी दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. मात्र शासनाने एका अध्यादेशाद्वारे हा दिवस मतदार दिवस घोषित केला आहे. या दिवशी कृषी दिनच साजरा व्हावा, अशी मागणी गोर सेनेने करून नवीन अध्यादेशाचा निषेध नोंदविला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
१ जुलै मतदार दिन घोषित करणे ही बाब गोर बंजारा समाजाचा घोर अपमान करणारी आहे. महानायकांच्या जन्मदिवसाला बगल देण्याचे कटकारस्थान राज्य सरकार करत आहे, असा आरोप करून संबंधित शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना गोर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष आडे, देवानंद राठोड, सुभाष राठोड, भारत जाधव, उमेश राठोड, भीमराव जाधव, बाळू राठोड, पी.बी. चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: The day of birth of Vasantrao Naik is as follows:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.