दत्त प्रासादिक शिक्षण मंडळातर्फे गृहराज्यमंत्र्यांचा आर्णीत सत्कार

By Admin | Updated: December 9, 2015 03:02 IST2015-12-09T03:02:43+5:302015-12-09T03:02:43+5:30

येथील श्री दत्त प्रासादिक शिक्षण मंडळाच्यावतीने राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा रविवारी आर्णी येथे सत्कार करण्यात आला.

Datta Prasadik Shikshan Mandal felicitates the Home Minister | दत्त प्रासादिक शिक्षण मंडळातर्फे गृहराज्यमंत्र्यांचा आर्णीत सत्कार

दत्त प्रासादिक शिक्षण मंडळातर्फे गृहराज्यमंत्र्यांचा आर्णीत सत्कार


आर्णी : येथील श्री दत्त प्रासादिक शिक्षण मंडळाच्यावतीने राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा रविवारी आर्णी येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार ख्वाजा बेग, आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग, दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय भारती, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. रणजीत पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानदानाचे कार्य करणारी दत्त प्रासादिक शिक्षण प्रसरक मंडळ ही विद्यार्थ्यांचे आदर्श व्यक्तिमत्व घडविणारी संस्था होय. या संस्थेची उत्तरोत्तर वाढ व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. डॉ. संजय भारती यांनी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेले आपले सहअध्यायी डॉ. पाटील यांच्याशी असलेल्या मैत्रीला उजाळा दिला.
कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. किरण भारती, प्रियदर्शन भारती, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माळवी, गजानन पाटील, प्रमोद बूब, संध्या पिस्तुलकर, मुख्याध्यापक ईश्वर दुगड उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राचार्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Datta Prasadik Shikshan Mandal felicitates the Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.