दातोडीतील शेतकऱ्यांची उडीद पिकाच्या भरपाईची मागणी
By Admin | Updated: September 10, 2015 03:05 IST2015-09-10T03:05:44+5:302015-09-10T03:05:44+5:30
रोग पडल्याने उडीद पिकाला फुले आणि शेंगा धरल्या नसल्याने नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी,...

दातोडीतील शेतकऱ्यांची उडीद पिकाच्या भरपाईची मागणी
आर्णी : रोग पडल्याने उडीद पिकाला फुले आणि शेंगा धरल्या नसल्याने नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी दातोडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात उडीद पिकावर पिवळा व्हायरस या रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे हेक्टरी ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. गोदावरी संभाराव जगताप, पंजाब भाऊराव जगताप, देवीदास किसन इंगळे, फिरोज हबीबभाई लालानी, रमेश भाऊराव जगताप या शेतकऱ्यांचे एक ते दोन हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)