दारव्हा येथे दारूबंदीसाठी मोर्चा
By Admin | Updated: June 27, 2015 00:33 IST2015-06-27T00:33:32+5:302015-06-27T00:33:32+5:30
यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला.

दारव्हा येथे दारूबंदीसाठी मोर्चा
दारव्हा : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
बचत भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर गोळीबार चौक, अंबादेवी मंदिर, मेन लाईन, भाजी मार्केट, दुर्गा चौक, कारंजा नाका, पोस्ट आॅफिस या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात धडकला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच दारूमुळे कशाप्रकारे संसार उद्ध्वस्त होतात यावर प्रकाश टाकला. शिवाय दारुबंदीसाठी निदर्शनेही करण्यात आली.
त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या मोर्चात दारव्हा शहरासह संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)