घाटंजी येथे प्राऊटिस्ट ब्लॉकचे धरणे
By Admin | Updated: June 16, 2016 02:51 IST2016-06-16T02:51:52+5:302016-06-16T02:51:52+5:30
घाटंजी : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आदींच्या प्रश्नांना घेऊन प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे देण्यात आले.

घाटंजी येथे प्राऊटिस्ट ब्लॉकचे धरणे
घाटंजी : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आदींच्या प्रश्नांना घेऊन प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदार वीर यांना निवेदन सादर करण्यात आले. मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात हरिभाऊ पेंदोर, गजानन राऊत, मोहन पवार, अशोक जयस्वाल, सय्यद कादर, जिजा बनसोड, दिनकर मानकर, गोपाल नामपेल्लीवार आदी सहभागी झाले होते.
थकीत शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून नवीन कर्ज तत्काळ द्यावे, कापसाला प्रती क्ंिवटल सात हजार रुपये दर जाहीर करावा, खरिपाच्या पेरणी वेळेतच पीक विम्याचा लाभ द्यावा, वृद्ध शेतकऱ्यांना पेंशन लागू करावी, बेरोजगारांना बँका व नागरी सहकारी पतसंस्थांमार्फत मुद्रा लोण मिळावे, अपंग, निराधार, वयोवृद्ध आणि विधवांना त्वरित अनुदान मिळावे, नवीन रेशन कार्ड दुरुस्ती, पत्यात बदल, नाव कमी करणे, वाढविणे यासाठी होणारी गैरसोय थांबवावी, विद्यार्थ्यांंना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था त्वरित करावी, नगर परिषद आणि ग्रामीण भागात शौचालयाचे अनुदान वितरित करावे, शहरी व ग्रामीण भागातील अतिक्रमितांना घराचे पट्टे वाटप करावे, नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही यात सुधारणा व्हावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)