शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतर हाल; तीन हजारांची पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हातात पडणारी पेन्शनही अपुरीच असते. पूर्वी १२०० रुपये पेन्शन मिळत होती. आता तीन ते साडेतीन हजारांपर्यंत ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हातात पडत आहे. मिळणारी पेन्शन आणि वाढती महागाई याच्यात कुठलाच ताळमेळ बसत नाही. यामुळे निवृत्तीनंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक हाल होतात. या संदर्भात वाढीव वेतनानुसार पेन्शन मिळावी म्हणून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वांना अधिक पेन्शन मिळण्याची आशा आहे.

ठळक मुद्देमुलांचे शिक्षण, आजारपण, दैनंदिन खर्च भागविण्याचीही पडली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबित एसटीचा प्रवास कायम सुरू ठेवला आहे. खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न कमी असल्याने परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतनही अल्प प्रमाणात देते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हातात पडणारी पेन्शनही अपुरीच असते. पूर्वी १२०० रुपये पेन्शन मिळत होती. आता तीन ते साडेतीन हजारांपर्यंत ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हातात पडत आहे. मिळणारी पेन्शन आणि वाढती महागाई याच्यात कुठलाच ताळमेळ बसत नाही. यामुळे निवृत्तीनंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक हाल होतात. या संदर्भात वाढीव वेतनानुसार पेन्शन मिळावी म्हणून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वांना अधिक पेन्शन मिळण्याची आशा आहे.

नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरफट

केंद्र शासनाच्या एम्प्लाॅईज पेन्शन योजनेमधून राज्य परिवहन महामंडळाचे पेन्शन अदा करण्यात येते. मिळणारे पेन्शन खर्चालाही न पुरणारे आहे. या पैशात काहीच होत नाही. १२०० ते ३५०० पर्यंत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे. - अविनाश राजगुरे

सध्याच्या स्थितीत कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन परवडणारी नाही. हातात पडणारे पैसे पाहिले तर त्यातून काहीच होत नाही. उलट सेवानिवृत्तीनंतर आजारपणावर सर्वाधिक खर्च होतो. अशा परिस्थितीत मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे.- मनिष बिसेन

निवृत्तीनंतर सर्वाधिक हालएसटी कर्मचाऱ्यांचे नोकरीत असताना अल्पवेतन कुटुंब चालविण्यासाठी अवघड ठरते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना तीन हजार रुपयांची पेन्शन हातात पडते. यात काहीच होत नाही. - संजय जिरापुरे, अध्यक्ष,महाराष्ट्र मोटर्स कामगार फेडरेशन

भविष्य निर्वाहनिधी वळतायवतमाळ विभागात परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्यूईटी फंड तात्काळ देण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या तरी कुणाचीही थकबाकी नाही. दर महिन्याला वेतन अदा होते.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

 

टॅग्स :state transportएसटीPensionनिवृत्ती वेतन