अभियंता महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:45 IST2021-09-18T04:45:24+5:302021-09-18T04:45:24+5:30

यानिमित्त अभियंता, डॉक्टर, कंत्राटदार व रोटरी क्लबने क्रिकेट सामने खेळले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात अभियंता, आर्किटेक्ट, बांधकाम साहित्य डीलर्स ...

Cultural program at Engineer Festival | अभियंता महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

अभियंता महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

यानिमित्त अभियंता, डॉक्टर, कंत्राटदार व रोटरी क्लबने क्रिकेट सामने खेळले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात अभियंता, आर्किटेक्ट, बांधकाम साहित्य डीलर्स यांनी सहभाग घेतला. अध्यक्ष कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सावन कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, उपविभागीय अभियंता प्रकाश झळके, असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पांडे, कार्याध्यक्ष अनवर अली उपस्थित होते.

सुरुवातीला मुस्ताकिम यांनी तांत्रिक प्रश्नमंजुषा घेतली. गीत गायन राजू नघाटे, जुगल, वैभव बजाज, देशमुख यांनी सादर केले. गजेंद्र निकम, श्रीकांत भागवत, अनवर अली यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणून सत्कार करण्यात आला. संघटनेने मागील ६ वर्षांत केलेल्या कामाची माहिती दिली. संचालन रोशनी रेड्डी व शुभम छतवाणी, आभार गजानन देशमुख यांनी मानले. यशस्वितेसाठी सचिव जय उबाळे, अमेय जिल्हेवार, अक्षय पीळवटकर, स्वप्निल पवार, लोकेश पोरकुटे, रोहिणी चिल्होलकर, सुनील कनवाळे, विजय ठाकरे, नितीन मानेकर, भाऊ कांबळे व सर्व अभियंत्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Cultural program at Engineer Festival