पुसद तालुक्यात अवैध धंद्यांनी गाठला कळस
By Admin | Updated: July 4, 2016 02:12 IST2016-07-04T02:12:21+5:302016-07-04T02:12:21+5:30
खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे सर्रासपणे सुरूच आहेत. सट्टा-पट्टीसह अवैध गावठी दारूभट्ट्या, असे अनेक अवैधधंदे सुरू आहेत.

पुसद तालुक्यात अवैध धंद्यांनी गाठला कळस
पुसद : खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे सर्रासपणे सुरूच आहेत. सट्टा-पट्टीसह अवैध गावठी दारूभट्ट्या, असे अनेक अवैधधंदे सुरू आहेत. खंडाळा पोलीस अवैध धंद्याना आवर घालण्याऐवजी वाढवित असल्याचे चित्र आहे.
खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यात गावठी दारू विक्री, अर्वध वाहतूक, अवैध जुगार अड्डे असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यातच मागील दोन महिन्यांत या अवैध धंद्यामुळे हत्येचे व आत्महत्याचे बरचे प्रकरण घडले आहे. सदर घटना कुंभारी, आडगाव, हिवळणी येथे घडल्या आहेत. वसंतवाडी, कुंभारी, वाघजाळी, म्हैसमाळ, पिंपळगाव, हिवळणी, अडगाव, फेट्रा, शिवणी, मोख, होरकड, रोडा, बेलोरा, नानंद, हनवतखेडा, रामपूरनगर, देवठाणा याठिकाणी मोठ्या प्रमाणात गावळी दारु भट्टी सुरू आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे कोणीही सभ्य व सामान्य नागरिक याविरुद्ध आवाज उठवित नाही. अवैध वाहतूक, जुगाराबाबत असे प्रकार चालू असतात. रस्त्याच्या किनाऱ्यावर व आजुबाजुच्या क्षेत्रात अवैधधंदे सुरू आहेत.
अवैध प्रवासी वाहतुकीकडून हफ्ता जमा करून वाहनधारकासह सट्टे, जुगार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ग्रामीण भागातील तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याने सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.
मेहनतीचा पैसा घरात न जाता सट्टा, जुगार, दारु यात उडविला जात असून, या धंद्यांना पोलिसांचा आशिर्वाद लाभत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अवैध धंदे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माळपठार भागातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीतून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)