झरीत बँकांसमोरील गर्दी अद्यापही कायमच
By Admin | Updated: March 3, 2017 02:05 IST2017-03-03T02:05:25+5:302017-03-03T02:05:25+5:30
नोटाबंदीला चार महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अजूनही बँकासमोरील गर्दी कमी झालेली दिसत नाही.

झरीत बँकांसमोरील गर्दी अद्यापही कायमच
झरी : नोटाबंदीला चार महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अजूनही बँकासमोरील गर्दी कमी झालेली दिसत नाही.
तालुक्यात झरी येथे महाराष्ट्र बँक आणि विदर्भ कोकण बँक आहे. महाराष्ट्र बँकेमध्ये कॅशीयर काउंटरसमोर लांबलचक रांग असल्यामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाया जातांना दिसतो. हीच परिस्थिती पाटण येथील महाराष्ट्र बँकेची आहे. लोकांना होणारा त्रास व बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा व्याप लक्षात घेता, कॅशियर काऊंटर वाढविणे गरजेचे झाले आहे. अजूनही बहुतांश ग्राहकांकडे एटीम नाही व महाराष्ट्र बँकेत पैसे जमा करण्यासाठी स्वाईप मशीन नाही.
तालुक्यातील मुकुटबन येथील स्टेट बँकमधीलही गर्दी कमी झालेली दिसत नाही. एकीकडे धावपळीच्या युगात लोकांकडे वेळ नाही. मात्र बँकेत पैसे जमा व काढण्यासाठी ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने अकारण त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)