क्रीडा विकासासाठी पावणेसात कोटी

By Admin | Updated: June 20, 2015 00:24 IST2015-06-20T00:24:23+5:302015-06-20T00:24:23+5:30

जिल्ह्यातील विविध खेळांचा प्रचार-प्रसार व्हावा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्हा वार्षिक ....

Crores of crores for sports development | क्रीडा विकासासाठी पावणेसात कोटी

क्रीडा विकासासाठी पावणेसात कोटी

नियोजन समिती : मागासवर्गीयांसाठी दोन कोटी
यवतमाळ : जिल्ह्यातील विविध खेळांचा प्रचार-प्रसार व्हावा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यासाठी पावणे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुक्रमे २ कोटी ३४ लाख आणि १ कोटी ५५ लाख रुपये मिळणार आहे.
रविवार १४ जूनला बचत भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी सहा कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतूदीला मान्यता देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत २५ लाख रुपये जास्त मिळाले आहेत.
सर्वाधिक चार कोटी ७६ लाख ५० हजार रुपये सर्वसाधारण योजनेसाठी आहे. यात युवक कल्याण कार्यक्रमासाठी ५.५० लाख रुपये, व्यायामशाळा सहाय्यक अनुदानासाठी एका कोटी ५० लाख, क्रीडांगण विकास अनुदान एक कोटी, समाजसेवा शिबिरासाठी २५ लाख तर क्रीडा केंद्र स्थापनेसाठी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आदिवासी उपयोजनेंतर्गत युवक कल्याण कार्यक्रम ८६.२१ लाख, व्यायामशाळा अनुदान एक कोटी १४ लाख, क्रीडांगण विकास २०.२७ लाख, स्वयंसेवी युवक मंडळासाठी १३.४८ लाख असे एकूण दोन कोटी ३४ लाख ७० हजार रुपये आदिवासीबहुल भागासाठी मिळणार आहे.
अनुसूचित जाती उपयोजनासाठी एक कोटी ५५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यात क्रीडांगण विकासासाठी ५० लाख रुपये, समाजसेवा शिबिर आयोजित करणे १५ लाख, युवक कल्याण मंडळ १५ लाख तर व्यायामशाळा विकासासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यायामशाळा, ग्रामपंचायत क्रीडा विकासासाठी शासनाच्या विविध योजनेंतर्गत अनुदान देत असते. २०१५-१६ या वर्षासाठी पावणे सात कोटी रुपयांचा निधी वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. २०१४-१५ यावर्षी जिल्हा क्रीडा कार्यालयाने सहा कोटी ५१ लाख ५० हजार रुपयाचे निधी वाटप केले होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Crores of crores for sports development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.