शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 08:33 IST

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका

रुपेश उत्तरवारयवतमाळ : अतिवृष्टीने संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. तब्बल नऊ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांंचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तथापि, नैसर्गिक आपत्तीमधील मदतीच्या निकषात सध्यातरी कुठलेही बदल झालेले नाहीत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपयांची मदत मिळण्याचे संकेत आहेत. या निकषाने नुकसान भरून निघणे अशक्य आहे.३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे, परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांचे संयुक्त पथक पंचनामे करीत आहे. पावसाने शेतातील पीक आणि सुपीक माती वाहून गेली. पुढील अनेक वर्षे पीक उभे राहणे अवघड आहे. यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटकाn कृषी विभागाच्या अहवालानुसार, पावसामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात झाले आहे. तेथे दोन लाख ९७ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाने घेतली. n एक हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेली. या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्याला फटका बसला. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे. सर्वेक्षणाअंती हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये नुकसानीचे वास्तव पुढे येणार विदर्भ व मराठवाड्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेला अडचणी येत आहेत. अहवाल तयार होण्यास विलंब लागेल. ऑगस्टपर्यंत नुकसानीचा खरा अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.

२०१५च्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तीत कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपयांची मदतीच्या सूचना आहेत. वाढती महागाई व नुकसान पाहता, ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरेल. नवीन सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. अद्याप निर्णय घेतलेला नाही.

नुकसान कुठे, किती?

(आकडे हेक्टरमध्ये)वर्धा     १,३१०००नागपूर     २८०००भंडारा     १९०००हिंगोली     १५,३०० गडचिरोली     १२०००बुलडाणा     ७०००अकोला     ८६४नाशिक     २०००पुणे     १,८००नंदूरबार     १९१रायगड     १०५गोंदिया     ५५ठाणे     २०वाशिम      १०सांगली     २अहमदनगर     २

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबईYavatmalयवतमाळRainपाऊस