३४ हजार हेक्टरातील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:32 AM2020-10-28T00:32:53+5:302020-10-28T00:33:26+5:30

जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.

Crops in 34 thousand hectares in water | ३४ हजार हेक्टरातील पिके पाण्यात

३४ हजार हेक्टरातील पिके पाण्यात

Next
ठळक मुद्देअती पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी : सोयाबीनला कोंबे फुटली, कापूस झाला जमिनदोस्त, तुरीलाही फटका

रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ३४ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यामध्ये सर्वाधिक फटका कापसाला बसला. जिल्ह्यात प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांना हातघाईस आणले. पेरणी करताना पावसाने पाठ दाखविली. पिके काढताना जिल्ह्यात पाऊस अतोनात बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसासारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागाचे सर्वेक्षण झाले, तर काहींचा अहवाल अप्राप्त आहे.

कापसाचे सर्वाधिक नुकसान
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस बरसला आणि कापसाची बोंड गळाली. आता कापूस घरात किती येणार, हा देखील प्रश्न आहे. पावणेपाच लाख हेक्टरवरील क्षेत्रापैकी १७ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

४९ हजार शेतकऱ्यांना फटका
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.

दारव्हातील नुकसान मोठे
जिल्ह्यात सतत बरसणाऱ्या पावसाने दारव्हा तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केली आहे. १९ हजार ३५२ हेक्टरला फटका बसला आहे. याशिवाय यवतमाळ वगळता इतर १५ तालुक्यातील पिकांना पावसाने फटका बसला आहे.

संयुक्त पंचनामे
पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे संयुक्तरित्या जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
- नवनाथ कोळपकर,
कृषी अधीक्षक

Web Title: Crops in 34 thousand hectares in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.