पीक विम्यासाठी गर्दी :
By Admin | Updated: July 28, 2016 00:50 IST2016-07-28T00:50:56+5:302016-07-28T00:50:56+5:30
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहे.

पीक विम्यासाठी गर्दी :
पीक विम्यासाठी गर्दी : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यातच रिलायन्स कंपनीच्या अर्जाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागातील बेलोरा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत मंगळवारपासून शेतकऱ्यांची अशी रांग लागली आहे. जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये पावसातही शेतकरी अशा रांगा लावून आहेत.